इंजिन बिघडले, प्रवासी लटकले; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

भुसावळ-पुणे एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा आसनगारदरम्यानची लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. खर्डी स्थानकात ही एक्सप्रेस इंजिनात बिघाड झाल्याने खोळंबून उभी राहिली आहे. या गोंधळामुळे वेळेवर कामाचे ठिकाण गाठण्यासाठी प्लॅटफॉर्मवर वेळेत पोहचूनही आज अनेक प्रवाशांना दिलेल्या वेळेत पोहोचता आले नाही.