चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा उषाताई लवेकर यांच निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
usha-lavekar

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

चिपळूण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा उषाताई लवेकर यांचे आज दुःखद निधन झाले. थेट नगराध्यक्ष निवडणुकीतून निवडून येत चिपळूणच्या नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. २००१ मध्ये थेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवत विजय मिळवला. पाच वर्ष त्यांनी चिपळूणच्या नगराध्यक्षपदाचा कारभार सांभाळला. त्यापूर्वी त्या नगरसेविकाही राहिल्या होत्या.