
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशातील आघाडीची आयुर्विमा कंपनी एलआयसीने आपली हीट पॉलिसी ‘जीवन अक्षय’ची विक्री १ डिसेंबर २०१७ मध्ये बंद केली आहे. त्यासोबतच अन्य काही पॉलिसी देखील त्यांनी बंद केल्या आहेत. व्याज दर सातत्यानं कमी होत असल्यानं गुंतवणुकदारांना चांगला परतावा देणं शक्य होणार नाही, हे लक्षात घेऊन या पॉलिसी बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच एलआयसीच्या वेबसाईटवर देखील ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवरून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महत्वाची बाब म्हणजे या पॉलिसी माघारी घेतल्या असल्या तरी तुम्ही आधीच या पॉलिसीत गुंतवणूक केली असेल चिंतेची बाब नाही. तुम्हाला कोणताही तोटा होणार नाही. तुम्हाला पॉलिसीचे सर्व फायदे मिळतील. पण सर्वात महत्वाचे म्हणजे या पॉलिसी विकण्यास कुणी आल्यास तुमची फसवणूक होणार नाही. (लिंक:- कोणत्या पॉलिसी माघारी घेण्यात आल्या आहेत)




























































