
सामना ऑनलाईन, माजलगाव
देशभरात झालेल्या विविध राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाने वेगवेगळ्या पक्षातील भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन त्यांना सदाचारी बनवले,उसाच्या मशीनमध्ये ऊस घातल्यावर जसा रस निघतो तसे या पक्षात आलेले भ्रष्टाचारी सदाचारी बनतात अशी टीका जेएनयूतील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने केली आहे. कन्हैय्याकुमारची माजलगाव इथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला याप्रसंगी आ. बाबाजानी दुर्राणी, पंकज चव्हाण,डॉ मिलिंद आवाड, डॉ भाऊसाहेब झिरपे ,मनोज फरके,मोहन जाधव उपस्थित होते.
या सभेमध्ये कन्हैया कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.’ चांगले दिवस येणार’ असे सांगून लोकांना फसवले असं म्हणतानाच कन्हैय्याने काळेधन आणण्याची घोषणेबाबत प्रश्न विचारताना म्हटले की कुठे गेले ते धन? कन्हैय्या कुमारने त्याच्या भाषणात ब्राह्मण समाजावरही टीका केली.समाजात समानता आणन्यासाठी संपत्तीतही आरक्षण आणा अशी मागणी केली

























































