
सामना ऑनलाईन । श्रीनगर
कश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडा येथे झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा दलाने अल बद्र या संघटनेच्या चार दहशतवाद्यांना अटक केली. हे चारही जण सीमा नियंत्रण रेषा पार करून पाकिस्तानमध्ये जाण्याच्या प्रयत्नात असताना जवानांनी त्यांना मोठय़ा शिताफीने अटक केली आहे. मात्र या दहशतवाद्यांसोबत असलेले इतर तीन दहशतवादी पाकव्याप्त कश्मिरात पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
जेरबंद केलेल्या या चार दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच हे दहशतवादी अल बद्र या दहशतवादी संघटनेत सहभागी झालेले आहेत. अटक केलेले चारही दहशतवादी हे 25 वयोगटातील आहेत.
summary-4 terrorist got arrested in kashmir






















































