पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rain-12

सामना ऑनलाईन । मुंबई

पूर्व हिंदुस्थानात तयार झालेल्या एका कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पूर्व विदर्भात 27 आणि 28 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामानतज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे या दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा जिह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाच्या या स्थितीमुळे नदीनाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते, ज्यामुळे काही गावांचा संपर्कदेखील तुटू शकतो. म्हणूनच नदीनाल्यांच्या काठी राहणाऱया लोकांनी सावध राहावे. या दरम्यान नागपूर, वर्धा, अमरावती, नांदेड, हिंगोली आणि वाशीम जिह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर उर्वरित विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात हलक्या पावसाची शक्यता असणार. राज्यातल्या इतर भागांतील हवामानात विशेष बदल होणार नाही. 28 ऑगस्टनंतर पुढचे काही दिवस राज्यात पुन्हा पाऊस कमी होणार असल्याचे मत हवामानतज्ञांनी वर्तविले आहे.