अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये गोळीबार, तिघांचा मृत्यू, 11 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । फ्लोरिडा

अमेरिकेत फ्लोरिडा भागात गोळीबार झाला आहे. या गोळीबार 3 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण गंभीर झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार एका व्हिडीयो टुर्नामेंटमदरम्यान गोळीबार झाला त्यात 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 11 लोक जखमी झाले असून त्यांना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

जॅक्सनविल शहरातील एंटरनमेंट कॉम्प्लेस मध्ये हा गोळीबार झाला आहे. एका व्हिडीयो गेम टुर्नामेंटच्या वेळी हा गोळीबार झाल्या होता, त्याचा एक व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीयोत गोळीबाराचा आवज ऐकू येत आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचून पुढील तपास करत आहेत.