भाजप सरकार चले जाव! धनगर समाजाच्या घोषणांमधून सरकारला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

आरक्षणाची आश्वासनं देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारनं ४ वर्ष झाली तरी देखील धनगर समाजासाठी काहीचं केलं नाही, असं म्हणत हा समाज रस्त्यावर उतरला आहे. भाजप सरकार चले जाव! अशा घोषणा देत तुळजापूरहून चौंडीच्या दिशेने निघालेली रॅली आज चापडगाव याठिकाणी धडकली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा असो धनगर असो किंवा महाराष्ट्रातील वंजारी, महादेव कोळी, गोवारी, जंगम शिवाय मुस्लिम समाजाच्या काही रास्त मागण्या असतील तर या सर्वच मागण्या मान्यतेसाठी संसदेकडे पाठवल्या पाहिजे अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळेच धनगर समाजाच्या न्याय मागण्यांसाठी निघालेल्या या यात्रेचे चापडगाव येथे या रॅलीचे शिवसेनेकडून स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड हे सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे व समाजाच्या वतीने तुळजापूर ते चौंडी अशी रॅली काढण्यात आली. ‘भाजप सरकार चले जाव’, असा नारा देत रॅलीमध्ये धनगर समाज सहभागी झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. चापडगाव येथे सर्व रॅलीचे स्वागत झाल्यानंतर ही रॅली चौंडीच्या दिशेने रवाना झाली.