बिघडलेल्या मशीनच दुरूस्त करून वापरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बेस्टच्या प्रवाशांना तिकीट देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मशीनपैकी 80 टक्के मशीन बिघडलेल्या असताना त्याच मशीन दुरुस्त करून कंडक्टरच्या माथी मारण्याचा बेस्ट प्रशासनाचा विचार आहे. भंगार झालेल्या मशीन दुरुस्त करण्यासाठी तीन कोटींचे कंत्राट देण्याचा प्रस्ताव महाव्यवस्थापकांनी बेस्ट समितीसमोर ठेवला होता. तो समितीने एकमताने फेटाळला. ट्रायमॅक्स कंपनीकडून खरेदी केलेल्या या 9330 मशीनपैकी 80 टक्के मशीन भंगारात काढण्याच्या लायकीच्या झाल्या आहेत. या मशीनने तिकीट निघत नसल्यामुळे, बसपास तपासणी होत नसल्यामुळे बेस्टचे दररोज लाखोंचे नुकसान होत आहे. गेल्या वर्षभरात बेस्टला 120 कोटींचा तोटा सोसावा लागला आहे.