कोपरगाव नजीक बस अपघातात एक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

नगर-मनमाड महामार्गावर बुधवारी सकाळी मोटारसायकलला बसची धडक बसली. यात मोटारसायकलस्‍वाराचा मृत्यू झाला आहे. ज्ञानदेव शिवराम बोरावके (६८) असे मृताचे नाव आहे. पुणे-धुळे परिवर्तनाची एक बस कोपरगावकडून धुळयाकडे निघाली होती. त्याचवेळी साईधाम पाटीनजीक पुढे जाणा-या मोटारसायकलला बसने जोराची धडक दिली. दरम्यान, मयत बोरावके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोपरगाव नगरपालिका गटनेते नगरसेवक विरेन बोरावके यांचे वडील होते.

बुधवारी सकाळी ११ ते ११.२० च्‍या सुमारास ज्ञानदेव बोरावके हे काळया रंगाच्‍या हिरो ड्रिम युगा एमएच १७ एटी. ६७७६ या मोटारसायकल वरून येवल्‍याकडे जात होते. ते साईधाम पाटीजवळ वळत असतांना पाठीमागून वेगाने येणाऱ्या धुळे आगाराच्‍या पुणे- धुळे या परिवर्तन बस क्रमांक एमएच २० बीएल ३४७० ने मोटारसायकलला जोरात धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या बोरावके यांना उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रूग्‍णालयात हलविण्यात आले. पण डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी बोरावके यांना मृत घोषित केले.

सदर खबरीवरून पोलीसांनी धुळे आगाराचा बस चालक तात्‍याभाऊ रामचंद्र थोरात (४१) रा. धुळे यांच्‍या विराधोत ५४/ २०१८ भादंवी १७४ प्रमाणे अपघाताचा गुन्‍हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. १७७७ आर.बी. तिकोणे हे तपास करीत आहेत. युवानेते आशुतोष काळे, पुष्पाताई काळे यांनी विरेन बोरावके यांच्‍या घरी जाऊन त्‍यांच्‍या कुटूंबाचे सांत्‍वन केले. सायंकाळी उशीरा कोपरगाव अमरधाम येथे त्‍यांच्‍या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्‍यसंस्‍कार करण्यात आले. कोपरगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षाचे पदाधिकारी, समाजबांधव व नागरीक मोठया संख्येने हजर होते.