
सामना ऑनलाईन, सोलापूर
भाजपचे खासदार शरद बनसोडे यांनी सोलापूरमधील कार्यक्रमात महिला, मुलींसमोर नको त्या विषयावर भाषण केल्याने त्यांच्यावर जबरदस्त टीका होत आहे. पानमंगरुळ गावातील डॉ. अशोक हिप्परगी यांच्या एकसष्टीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे देखील उपस्थित होते. या सगळ्यांच्या उपस्थितीत शरद बनसोडे यांनी कानडी भाषेत भाषण केलं.
मात्र त्यांनी ज्या विषयावर भाषण केलं तो विषय सार्वजनिक ठिकाणी लोकप्रतिनिधीने चर्चा करण्यासारखा अजिबात नव्हता. उपस्थितांनी बनसोडे यांच्या भाषणावर आक्षेप घेत त्यांचे भाषण बंद पाडले. बनसोडे यांना गोंधळ का झाला हे कळाले नव्हते, त्यामुळे त्यांनी मराठीत सांगू काय असा प्रश्न विचारला. यामुळे उपस्थित आणखीनेच भडकले. अखेर काँग्रेस आमदाराने त्यांच्या हातातील माईक काढून घेतला ज्यामुळे बनसोडेंचे भाषण संपले.


























































