सलग दुसर्‍या दिवशी कश्मीरमध्ये रेल्वे सेवा बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । श्रीनगर

कलम ३५ ए च्या सुनावणीदरम्यान कश्मीरमध्ये जोरदार निदर्शने होणार आहेत, ही बाब लक्षात घेऊन सलग दुसर्‍या दिवशी रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. रेल्वे संपत्तीचे नुकसान होऊ नये यासाठी हे पाऊल उचल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले.

मध्य कश्मीरमध्ये श्रीनगर ते बडगाम आणि बारामुल्ला पर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच श्रीनगर-अनंतनाग-काजीगुंड आणि जम्मूतील बनिहाल भागातही रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे. कश्मीर खोर्‍यात निदर्शनावेळी जमाव नेहमी सार्वजनिक संपत्तीला लक्ष्य करतात. २०१६ मध्ये बुरहान वाणीला लष्कराने ठार केल्यानंतर कश्मीरमध्ये तणाव निर्माण झाला होता.  हिंसक जमावाने रेल्वे संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकास केले होते.