जिथे सुंदर मुली असणार तिथे बलात्कार होणार, राष्ट्राध्यक्षांचं वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मनीला

‘जिथे सुंदर मुली असणार तिथे बलात्कार तर होणारच’, असे वादग्रस्त वक्तव्य फिलीपीन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांनी केले आहे. फिलीपीन्सच्या दबाओ शहरात गेल्या तीन महिन्यात सर्वाधिक बलात्कार झाल्याच्या वृत्तावर वक्तव्य करताना त्यांची जीभ घसरली.

मुस्लिमांमुळेच देशातील बलात्कार वाढले, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

फिलिपिन्सच्या गृह खात्याने दिलेल्या अहवालानुसार दबाओ येथे गेल्या तीन महिन्यात सर्वाधिक बलात्कार झाले आहेत. याबाबत एका कार्यक्रमात बोलताना रॉड्रीगो म्हणाले की, जिथे सुंदर मुली असतील तिथेच बलात्कार होतात’, त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

रॉड्रीगो यांनी याआधी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्य केलेली आहेत. याआधी रॉड्रीगोंनी कम्युनिस्ट महिलांच्या गुप्तांगात गोळ्या घातल्या पाहिजे असे वक्तव्य केले होते. तसेच त्यांनी दक्षिण कोरियात भर कार्यक्रमात एका महिलेचे चुंबन घेतले होते.

summary : Philippine President Rodrigo Duterte controversial statement on rape