लोकनायक संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन   

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

शहरातील मोठ्या प्रमाणात असणार्‍यां नागरी समस्यांकडे महानगर पालिका दुर्लक्ष करीत असल्याचा कारणावरुन लोकनायक संघटनेच्यावतीने गोलाई येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

लातूरचे आमदार, पालकमंत्री, प्रशासन लातूर शहरातील नागरी समस्यांची सोडवणूक करण्यासाठी दुर्लक्ष करीत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. खड्यांमुळे अपघात होत आहेत. शहरात जागोजागी कचर्‍यांचे ढिग जमा होत आहेत. अमृत योजनेसाठी रस्ते खोदण्यात आले परंतू त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. गोलाईच्या सुशोभीकरणासाठी आलेला निधी कुठे गेला असा सवाल करीत महानगर पालिकेच्या निषेधार्त हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अजित घार, महादू रसाळ, बंटी गायकवाड, शिवा चवरे, किशन कदम यांच्यासह इतर नागरीकांचा सहभाग होता.