
सामना ऑनलाईन । कोलकाता
कोलकातामध्ये भीषण दुर्घटना घडली असून 40 वर्ष जुना पूल चालत्या गाड्यांसह कोसळला आहे. कोलकाता दक्षिणकडील माझेरहाट पुलाचा एक भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी आहेत. जखमींमधील काही जणांची प्रकृति चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. तसेच पुलाच्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
#SpotVisuals: Majerhat bridge in South Kolkata has collapsed. More details awaited. #WestBengal pic.twitter.com/FsZGeImE4o
— ANI (@ANI) September 4, 2018
मंगळवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दुर्घटनेनंतर एनडीआरफच्या तीन टीम घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. पुलाच्या ढिगाऱ्याखाली काही गाड्या आणि लोक दबले असण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून तीन लोकांना बाहेर काढण्यात आले असून त्यांची प्रकृति चिंताजनक आहे.
दरम्यान, राज्यमंत्री फरदह हकीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बचाव कार्याचा आढावा घेतला असून दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी याची उत्तस्तरीय चौकशी करण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे.
Our team is focused on relief and rescue work. Our priority is relief and rescue. Rest of the investigation will be done later: West Bengal CM Mamata Banerjee on Majerhat bridge collapse in South Kolkata https://t.co/E4vwky8g1s
— ANI (@ANI) September 4, 2018






















































