
सामना ऑनलाईन । संभाजीनगर
विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचा ‘कायम’ शब्द काढल्यानंतर त्यांच्या अनुदानासाठी मूल्यांकन करण्यात आले. परंतु शासन काही ना काही त्रुटी काढून शिक्षकांना अनुदानापासून वंचित ठेवत आहेत. याचा निषेध म्हणून आज क्रांतीचौकात शिक्षकांनी भीक मांगो आंदोलन करून शिक्षकदिन साजरा केला. या आंदोलनात जमा झालेली रक्कम शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
या भीक मांगो आंदोलनात प्रा. मनोज पाटील, धनंजय खेबडे, आशा नारळे, संजय चव्हाण, विजय शिंदे, रामेश्वर साळुंके, सुनील कोतकर, रोहित पाटील, तुकाराम जाधव, अंबरसिंग जारवाल, आरके आनंद, सुनील गोरे, विष्णू सुरासे, अरुण राठोड, जाहेद पटेल, ए. पी. पाटील, सिद्धार्थ कुलकर्णी, काळवणे के., सोनाली नवपुते, अनिता पाटील, नमीता सावंत, स्वाती लोमटे, सोनाली देशमुख, साधना दंडे, शुभांगी शिंदे, पूनम वळसे, दीप्ती हजारे, शीतल हुकुम, स्वाती उगले, शीतल आरकांद, प्रियंका चव्हाण आदि सहभागी झाले होते.





























































