
सामना ऑनलाईन, मायामी
भरदिवसा गजबजलेल्या रस्त्यावर एकमेकांसोबत अश्लील चाळे करताना दोन धर्मगुरुंना अटक करण्यात आली आहे. डिएगो बेरिओ(वय-३९ वर्षे) आणि एडविन कोर्टेझ(वय-३० वर्षे) अशी या दोघांची नावे आहेत. मायामी बीच रस्त्यावर या दोघांना नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर ये-जा करणाऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली होती. पोलीस तिथे येईपर्यंत या दोघांचे चाळे सुरूच होते.
काळ्या रंगाच्या गाडीमध्ये या दोघांचे नको ते प्रकार सुरू होते. पोलिसांनी त्यांच्या गाडीच्या खिडकीवर टकटक केल्यानंतरही त्यांनी त्यांच्याकडे लक्ष ने देता त्यांचं किळसवाणे प्रकार चालू ठेवले होते. या प्रकाराबात कळाल्यानंतर चर्चच्या वरिष्ठ धर्मगुरुंनी या दोघांवरही कारवाई करत त्यांना धर्मगुरू या पदावरून हाकलून दिलं आहे. हा प्रकार आमच्यासाठी अत्यंत गंभीर आमि लाजिरवाणा असल्याची प्रतिक्रिया शिकागोच्या आर्चबिशपनी दिली आहे.
























































