
सामना ऑनलाईन । मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक मुंबईतील लालबागच्या राजाचे गुरुवारी सायंकाळी दर्शन घेतले. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी गणेश गल्ली येथील मुंबईच्या राजाचे देखील दर्शन घेतले.



























































