प्रस्थापिताची बत्ती लागली, मोहन जगताप मैदानात उतरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उदय जोशी । बीड

माजलगाव मतदार संघाचे वातावरण चांगलेच तापले आहे. नेहमीच्या प्रस्थापितांना शह देण्यासाठी माजी आमदार बाजीराव जगताप यांचे सुपुत्र मोहनराव जगताप निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मित्र मंडळाच्या शाखा स्थापनेचा धडाका लावला असून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शुक्रवारी भाजपाच्या बालेकिल्ल्यात कोठरबन येथे मोहनराव जगताप मित्र मंडळाची शाखा स्थापन करण्यात आली. या वेळी बोलतांना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा घेऊनच आपण छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निर्मिती ही फक्त शेतकऱ्यांचे हित जोपसण्यासाठीच केलेली असून ज्या प्रमाणे छत्रपतीनी अठरापगड जाती-धर्माचे मावळे सोबत घेऊन मोगलांचे सामाज्र उद्धस्त केले त्याच प्रमाणे या मतदार संघात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्यांचे साम्राज्य मित्र मंडळाच्या मध्यमांतुन सर्व अठरापगड जाती-धर्माच्या कार्यकर्त्याना सोबत घेऊन नष्ठ करू. येणाऱ्या 2019 च्या विधानसभेची निवडणूक जिंकून या मतदार संघात स्वराज्य आणल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असं मत छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन मोहन जगताप यांनी शाखा उद्घाटन शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.

मोहन जगताप पुढे म्हणाले की,गेली पंधरा वर्ष कारखानदारीच्या जोरावर उसाचे राजकारण करीत शेतकऱ्यांना ज्यांनी वेठीस धरले आता त्यांना जागा दाखवण्याची योग्य वेळ आली आहे. माझ्याकडून कधीच उसाचे राजकारण होणार नाही. सर्वसामान्यांचा विकास करणं हाच आपला उद्देश असून विरोधकांनी मित्र मंडळाची चांगलीच धास्ती घेतलेली असून त्यांना स्वतापेक्षा माझी चिंता जास्त आहे. सर्वसामान्य जनता हाच माझा पक्ष आहे. तर जनता तुमचा पराभव करेल यात आता मिळ मात्र शंका नाही. मोहन जगतापांना पक्ष नाही म्हणाऱ्यांना आगामी काळात पक्ष ही दाखवून देऊ अन् निवडूनही येऊन दाखवू. त्यासाठी आता जनता माय-बाप तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आज जे तुमचे प्रेम आणि आशिर्वाद मिळाले आहेत. ते कायम असेच राहू द्या. तुमच्याच सहकार्याने विरोधकांचा पराभव करुन आपण विजयी होऊ यांची मला पूर्णपणे खात्री आहे.