
सामना ऑनलाईन, तिरूनेलवेली
तमिळनाडूमधल्या तिरुनेलवेली शहराजवळ असलेल्या शेनकोट्टाई गावात माथेफिरू मुसलमानांनी धुडगूस घातला आहे. गणपती आगमनाच्या मिरवणुकीदरम्यान या मुसलमानांनी तुफान दगडफेक केली, या धर्मांधांनी दारूच्या रिकाम्या बाटल्याही फेकून मारल्या. या दगडफेकीमध्ये शेकडो हिंदू जखमी झालेत. या दगडफेकीत गणपतीच्या मुर्तीचंही नुकसान झाल्याचा आरोप केला जात आहे.
ज्या भागात ही दगडफेक झाली, त्या भागात मोठ्या प्रमाणावर मुसलमान राहतात. वर्षानुवर्ष याच भागातून मिरवणूक काढण्यात येते, ज्याला या मुसलमानांनी विरोध केला होता.गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी मिरवणुकीचे आयोजक आणि मुसलमानांच्या प्रतिनिधींसोबत बैठक बोलावली होती. मिरवणूक या भागातून जात असताना मोठ्या प्रमाणावर मुसलमान तरूण एकत्र जमले आणि त्यांनी मिरवणुकीवर दगडफेक करायला सुरुवात केली. धक्कादायक बाब ही आहे की हा सगळा प्रकार पोलिसांच्या डोळ्यादेखत होऊनही त्यांनी काहीही कारवाई केली नाही.
वंदीमरीचम्मन मंदिरात ही मुर्ती आणण्यात येत होती. रात्री ९ च्या सुमारास ही मुर्ती वाजतगाजत पेरिया पल्लिवासल रस्त्यावरून जात असताना मिरवणुकीवर दगडफेक झाली. या दगडफेकीमुळे आणि गणपतीच्या मुर्तीची नासधूस केल्याच्या सोशल मिडीयावर पसरलेल्या बातमीमुळे हिंदू धर्मियांमध्ये संतापाची जबरदस्त लाट उसळली आहे. हा सगळा प्रकार पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याने अशी प्रतिक्रिया तिथल्या एका स्थानिक हिंदू नागरिकाने दिली आहे.
मुसलमानांनी या भागात जवळपास ३ तास हैदोस घातला. त्यांनी मिरवणुकीत सहभागी झालेल्यांवर चपलाही फेकून मारल्या. या दगडफेकीत १० पोलीस कर्मचारी जखमी झाले असून जवळपास ३३० दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे.
हा सगळा प्रकार झाल्यानंतर पोलिसांनी धावपळ करत परिस्थिती शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या गावात ५०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. १३ तारखेला रात्री २.३० पर्यंत हिंदू आणि मुसलमान धर्मियांसोबत पोलिसांनी बैठक घेतली. माथेफिरू मुसलमानांच्या प्रतिनिधींनी आम्ही या भागातून मिरवणूक जाऊ देणार नाही अशी आडमुठी भूमिका कायम ठेवली, त्यामुळे शुक्रवारी पुन्हा एकदा ही बोलणी सुरू करण्यात आली होती. तरीही धर्मांधांची भूमिका काही बदलली नव्हती. तिरूनलवेलीच्या जिल्हाधिकारी शिल्पा सतीश यांनी शेनकोटाई भागात जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
























































