बाललीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणपती बाप्पाने आपले बाल्य अगदी जीवापाड जपले आहे. पार्वती आईकडून लाड करून घेण्यापासून ते युक्तीने संकटातून सहज मार्ग तो आपल्या बाललीलांमधून काढतो. 

महर्षी व्यासांनी महाभारत लिहिण्याचे ठरविले तेव्हा आपले जीवनानुभव स्मरण करुन एकटय़ाने लिहून काढणे आपणास शक्य नसल्याचे त्यांना जाणवले. तसेच सर्व देवांमध्येही त्यांना तोडीचा लेखनिक कोणीच आढळेना. मग महर्षी व्याास ब्रह्मदेवाकडे गेले.

ब्रह्मदेवांना महर्षी व्यास म्हणाले, ‘हे देवाधिदेव! मी माझ्या जीवनातल्या अनुभवाकर आधारित महाभारत ग्रंथ लिहिण्याचे ठरविले आहे. परंतु विचार करून प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेऊन ते लिहून काढणे मला एकटय़ाला शक्य नाही. तेक्हा मला मी सांगितलेले समजून घेऊन प्रत्येक श्लोकाचा अर्थ व्यकस्थित समजावून लिहिणारा लेखनिक सहाय्यक म्हणून हवा आहे.’

हे ऐकून ब्रह्मदेव महर्षी व्यासांना म्हणाले, तुमचे हे लेखनकार्य सिद्धीस नेण्यासाठी शिवसतीपुत्र गणेशाशिवाय दुसरी योग्य व्यक्ती कोणीच असू शकत नाही. म्हणून तुम्ही गणेशासच तुमच्या या कार्यासाठी तयार करा.

ब्रह्मदेवाचे हे उत्तर ऐकून महर्षी व्यास गणेशाकडे गेले व त्यास विनंती करून म्हणाले, ‘हे गणेशा! ब्रह्मदेवाच्या सांगण्याकरून मी तुमच्याकडे आलो आहे. माझ्या ‘महाभारत’ लेखनकामी तुम्ही मला सहाय्य करावे अशी माझी इच्छा आहे.’

व्यासांचे म्हणणे ऐकून गणेश त्यांना म्हणाला, ‘महर्षी, मी तुमची इच्छा पूर्ण करीन, पण माझीसुद्धा एक अट आहे.’ ‘मी लिहिताना तुम्ही न थांबता कथन करावे. जर तुम्ही मध्येच थांबलात तर माझी एकाग्रता भंग होईल. तसेच मध्ये वेळ दवडणे मला आवडणार नाही.

महर्षी व्यासांनी गणेशाची अट मान्य केली आणि म्हणाले, पण तूसुद्धा मी जे जे काही सांगेन ते अर्थ समजल्याशिवाय लिहायचे नाहीस. प्रत्येक श्लोकाचा अर्थ प्रथम नीट समजून घेऊन लिहिणे हे महाभारत लेखनाच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. एखादी गोष्ट पूर्ण समजल्यावाचून लिहिणे हे कदापिही शक्य आणि योग्य होणार नाही.’

गणेशानेही महर्षी व्यासांचे म्हणणे मान्य केले. मग महर्षींनी कथानकास सुरुवात केली. महाभारत कथन करता करता व्यासांच्या लक्षात आले की गणेश अर्थ समजून घेऊनही खूपच जलद गतीने लिहू शकतो आहे. तेव्हा त्यांनी अधिकाधिक कठीण व गहन श्लोक सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याचा अर्थ समजून घेऊन लिहिण्यास गणेशास जास्त वेळ लागू लागला. तेवढ्या वेळात मग महर्षी व्यास नवीन श्लोक रचून तयार ठेवत.

अशा प्रकारे महाभारत सहजतेने पूर्ण झाले आणि आजही आपण त्याचा आनंद उपभोगू शकतो.

आईचा शब्द राखला
भोळ्या शंकराने राक्षसपती रावणास प्रसन्न होऊन स्वतःचे आत्मलिंग घेऊन जाण्यास परवानगी दिली. पार्वती माता चिंतीत झाली. काय करावे… तिने गणपतीस कसेही करून रावणास रोखण्यास सांगितले. शंकराने एकच मेख घातली होती… वाटेत रावणाने ते शिवलिंग खाली ठेवले तर तो ते पुन्हा उचलू शकणार नाही.

गणपतीने गुराख्याचे रूप घेतले आणि वाटेत त्याला रावण दिसला. रावणाला लघुशंका आलेली… आता काय करावे… हे शिवलिंग हातात धरण्याची विनंती रावण वाटेत भेटलेल्या गुराख्याला करतो आणि खाली न ठेवण्याबद्दल बजावतो. बराच वेळ झाला रावण परत येत नाही असा विचार करून गुराख्याच्या रूपातील गणपती बाप्पा शिवलिंग खाली ठेवतो… आणि आपल्या आईला दिलेले वचन पूर्ण करतो.