शिवसेनेच्या वतीने आजपासून जिल्ह्यात सदस्य नोंदणी अभियान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी  । संभाजीनगर

शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात सदस्य होण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यात सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक मतदारसंघात विभागनिहाय नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी कळवले आहे.

उद्या शनिवार १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता वैजापूर तालुक्यातील शिऊर, वाकला, बोरसर, खंडाळा या विभागाची सदस्य नोंदणी अभियान स्थळ :- श्री गणेश मंदिर, शिऊर या ठिकाणी होणार आहे. तसेच सकाळी ११ वाजता वैजापूर शहर, वांजरगाव, सवंदगाव, महालगाव, लासूरगाव, घायगाव या विभागाचे अभियान स्थळ : श्री सुंदर गणपती मंदिर, वैजापूर या ठिकाणी तसेच दुपारी १.३० वाजता गंगापूर विधानसभा क्षेत्र विभागाची सदस्य नोंदणी अभियान स्थळ :- श्री गणपती मंदिर कोळघर या ठिकाणी होणार आहे. या अभियानास माजी आमदार आर.एम. वाणी, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सदस्य नोंदणी अभियानास शिवसेनेचे सर्व उपतालुकाप्रमुख विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, सहप्रमुख, आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, लक्ष्मण भाऊ सांगळे, कृष्णा पाटील डोणगावकर, संतोष काळवणे, तालुकाप्रमुख रमेश बोरनारे, दिनेश मुथा, सुभाष कानडे, महिला आघाडी जिल्हा संघटक आनंदीताई अन्नदाते यांनी केले आहे.

रत्नपूर तालुक्यात रविवार, १६ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता  रत्नपूर  तालुक्यातील बाजारसावंगी वेरूळ गदाना रत्नपूर शहर या विभागाचे सदस्य नोंदणी अभियान श्री लक्ष विनायक गणेश मंदिर, वेरुळ या ठिकाणी होणार आहे.

गंगापूर तालुक्यात १८ सप्टेंबर, मंगळवारी सकाळी ९:३० वाजता शेंदूरवादा, वाळूज, रांजणगाव, गंगापूर, जामगाव, कायगाव या विभागाची सदस्य नोंदणी अभियान शेंदूरस्त गणपती मंदिर, शेंदूरवादा या ठिकाणी होणार आहे. दुपारी १२.१५ वाजता लासूर, सिल्लेगाव, आंबेलोहळ, तुर्काबाद या विभागाचे सदस्य नोंदणी अभियान संस्थान गणपती मंदिर लासूर स्टेशन या ठिकाणी होणार आहे.

संभाजीनगर पूर्व शहर बुधवार, १९ सप्टेंबर ेरोजी सदस्य नोंदणी अभियान सकाळी ९:३० वाजता मकरंद कुलकर्णी, सुरेश कर्डिले अनिल जयस्वाल, शिवा लुगारे, बाळासाहेब सानप यांच्या कार्यक्षेत्रातील सदस्य नोंदणी अभियान सिद्धिविनायक गणपती मंदिर, एन-५, सिडको, सह्याद्रीनगर या ठिकाणी होणार आहे. सकाळी ११ वाजता उपशहरप्रमुख संतोष खेडके वामन शिंदे, दिग्विजय शेरखाने, जयसिंह होलीये यांच्या कार्यक्षेत्रातील सदस्य नोंदणी अभियान सिद्धिविनायक गणेश मंदिर भवानी हाऊसिंग सोसायटी विद्यानगर या ठिकाणी होणार आहे.

संभाजीनगर पश्चिम शहराचे गुरुवार, २० सप्टेंबर रोजी सदस्य नोंदणी अभियान सकाळी ९:३० वाजता उपशहरप्रमुख बापू पवार, रतन साबळे, अनिल मुळे, विभीषण काळे, रमेश बाहुले, वसंत  शर्मा यांच्या कार्यक्षेत्रातील सदस्य नोंदणी अभियान संकटमोचन गणेश मंदिर जवाहर कॉलनी या ठिकाणी होणार असून, सकाळी १०:१५ वाजता संजय बारवाल, संतोष मरमट,राजू राजपूत , किशोर कच्छवा,अंबादास म्हस्के यांच्या कार्यक्षेत्रातील सदस्य नोंदणी अभियान पन्नालालनगर गणेश मंदिर क्रांतीचौक ठिकाणी होणार आहे तसेच सकाळी ११:३० वाजता दौलताबाद, बजाजनगर पंढरपूर, गांधेली या विभागाचे सदस्य नोंदणी अभियान सिद्धिविनायक गणेश मंदिर, बजाजनगर या ठिकाणी होणार आहे.

संभाजीनगर मध्य शहराचे शुक्रवार, २१ सप्टेंबर रोजी सदस्य नोंदणी अभियान सकाळी ९:३० वाजता उपशहरप्रमुख गणपत खरात, संदेश कवडे, सुनील सिसोदिया, संजय हरणे यांच्या कार्यक्षेत्रातील सदस्य नोंदणी अभियान सत्यविनायक गणेश मंदिर नवजीवन कॉलनी यादवनगर या ठिकाणी होणार आहे. सकाळी १०:३० वाजता उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, टिनू कच्छवा, चंद्रकांत इंगळे, हिरा सलामपुरे, बाळू गडवे यांच्या कार्यक्षेत्रातील सदस्य नोंदणी अभियान दिवाणदेवडी गणेश मंदिर, गुलमंडी या ठिकाणी होणार आहे.