दारूच्या नशेत केला चुलत भावाचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लांजा

दारूची नशेत सख्या चुलत भावाला गाडीत मारहाण करत गाडीतून फेकून दिल्याने भावाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालूक्यातील सापूचेतळे येथे शुक्रवारी सायंकाळी ४:३० वा .घडली. या प्रकरणी असून पोलिसांनी दोन जणांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सापूचेतळे येथील तीन सख्खे चुलत भाऊ शुक्रवारी दुपारी कामानिमित्त कार  घेऊन लांजा येथे आले होते. लांजा येथे यातील दोन भावाचे आपसात शाब्दीक वाद झाले. त्यानंतर या तिघांनी बेभान मद्यप्राशन करून सोबत दारूच्या बाटल्या घेऊन गाडीत आणखी दारू पित जात असताना मनोहर गोरेने कौस्तुभ गोरे  याच्या अंगावर दारू ओतली. अंगावर दारू ओतल्याचा राग आल्याने कौस्तुभ आणि मनोहर या  दोघांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली.  मनोहरचे डोके कौस्तुभने गाडीतल्या गँस सिलेंडरवर आपटल्याने तो जागीच बेशुध्द पडला.  मनोहर गोरे बेशुध्द पडलेल्याचे पाहून  कौस्तुभने गाडी चालवत असलेल्या रोहनला त्याची कल्पना दिली. त्यानंतर कौस्तुभ व रोहनेने त्याच रस्त्यावरून घरी जाताना सुखादेवी जवळ मनोहर गोरेला गाडीतून बाहेर फेकून दिले. त्यानंतर  मनोहरने स्वातःहून गाडीतून उडी मारल्याचा बनाव करून  नंतर  त्याला उचलून उपचारासाठी सापूचेतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात घेउन गेले .परंतु तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. सापुचेतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध नसल्याने तेथील युवकांनी मृत्यूची खात्री करण्यासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तो आधीच मृत पावल्याचे  डॉक्टरांनी घोषित केले .

त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी झिरो नंबरने एफआयआर दाखल करून अधिक तपासासाठी लांजा पोलीसांकडे पाठवून दिले. लांजा पोलिसांनी सुरवातीच्या तपासामध्ये विचारणा केली असता कौस्तुभ व रोहन याने मनोहर याने दारूच्या नशेत धावत्या गाडीतून उडी मारल्याचा बनाव केला होता. परंतु पोलिसांनी आपला पोलीसी खाक्या दाखवल्यानंतर दोघांनी गुन्हा कबूल केला .

लांजा पोलिसांनी मनोहर  गोरे (२२) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरवत कौस्तुभ रामचंद्र गोरे ( वय – २९ ) व रोहन गोरे ( वय – २८ ) या दोघांविरोधात  खूनाचा गुन्हा दाखल केला  असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विकास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंडित पाटील हे करीत आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व याबाबत अधिक तपास करण्याचे आदेश दिले आहे.