अज्ञात वाहनाच्या धडकेत मोकाट गाईचे पाय निकामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

तालुक्यातील सहा कि. मी. अंतरावरील फणसवणे पुलावर आज सकाळी रक्ताचे सडे पाहुन अनेकांच्या काळजात धडकी भरली तर अनेकजण तर्क वितर्क लढवण्यात गर्क असताना पुलाच्या बाजुला अर्ध मेल्या अवस्थेत  एक गाय जिचे दोन्ही पाय रक्ताने भरलेले दिसले आणि त्या गाईला कोणा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो रक्ताचा सडा या गाईचाच असल्याने अनेक जणानी हळहळ व्यक्त केली.

कळंबस्ते येथील अनेक जनावरे गेली चार वर्ष मोकाट फिरत असुन या जनावरांचे मालक असुनही कोणीच याची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही.  ३० ते ३५  जनावरे मोकाट असुन दिवसा शेतकऱ्यांच्या  शेतात राजरोस पणे येथेच्छ ताव मारुन नुकसान करताना दिसतात. तर रात्री फणसवणे पुलावर व अंत्रवली फाट्यावर रस्त्याच्या मधोमध बसलेली पाहयला मिळतात.  वाहन चालकांना खाली ऊतरुन जनावरे बाजुला हाकलुन मार्ग काढावा लागतो. अनेक वेळा या जनावरांच्या मालकाना स्वतः शेतकऱ्यांनी तर अनेक वेळा तंटा मुक्ती समितीच्या माध्यमातुन तर कधी पोलिसांमार्फत समज देऊनही काहीच फायदा होत नसल्याने अनेकानी शेती करणे सोडुन दिले आणि नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत या मोकाट गुरांचा लिलाव करण्यास परवानगी मिळावी असा सर्वानुमते ठराव पारित करुन तहसिलदार देवरुख आणि पोलीस निरीक्षक संगमेश्वर यांच्या कडे पाठवण्यात आला .

  रात्री अशीच मोकाट गुरे रस्त्यात बसलेली असता कोणा वाहन चालकाच्या गाडीचे चाक  गाईच्या पायावरुन गेल्याने   आज सकाळी ग्रामस्थांनी फणसवणे पुलावर ताज्या रक्ताचे पाट वाहताना पाहिले आणि विविध चर्चांना ऊधाण  आले. प्रत्येकजण आपआपल्या परीने तर्क वितर्क लढवत होता. पण शेवटी रस्त्याच्या बाजुला अर्धमेली जखमी अवस्थेत दोन्ही पाय जायबंदी झालेले पाहायला मिळाली आणि साऱ्या  गोष्टीचा ऊलगडा झाला.

त्याच वेळी या मोकाट गुरांच्या मालकाची नावे समजली ती अशी अनंत दाजी कदम, (कपील नगर) राजा घोरपडे (फणसवणे) ईक्बाल नेवरेकर, फातिमा दसुरकर, ईब्राहीम दसुरकर, सर्व रा. कळंबस्ते. तर अय्याज ऊस्मान नेवरेकर रा . कळंबस्ते याची सात ते आठ जणावरे असुन हा गावात रहत नाही. यांचा स्वतःचा गोठा नाही, शेती वाडी नाही असे असताना ही जनावरे कशाला पाळतात ? हा मोठा प्रश्न आहे. आज एका गाईच्या गंभीर अपघाताने संतापाची लाट ऊसळली आहे. या मोकाट गुरांच्या मालकांवर पोलिसांनी त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.