वसईत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, विरार

डिजे वाजवून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या गणेश मंडळांवर पोलिसी कारवाईचे विघ्न ओढावले आहे. वसई पोलिसांनी तालुक्यात ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली असून त्यांच्याकडून दंडही वसूल केला आहे.

विरार पोलिसांनी पूर्वेकडील फूलपाडा राधेश्याम चाळीतील जिगर वाघेला, रवी सोळंकी यांच्यावर ध्वनिप्रदूषणाचा गुन्हा दाखल केला आहे, तर अर्नाळा सागरी पोलिसांनी आगाशी पोलीस चौकीसमोरील संकेत पाटील, अमित पाटील, विजय पाटील आदींकर गणेश विसर्जनात डिजे वाजवल्याने गुन्हा दाखल केला. तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीपा बारनजीक तलाठी कार्यालयाजवळ, आचोळे, सेंट्रल पार्क, डॉन लेन आदी ठिकाणच्या गणेश मंडळ कार्यकर्त्यांवर परवानगी न घेता डीजे वाजवल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे, तर वालीव येथे राहुल पवार यांच्यावरही अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली आहे.

summary- complaint against mandals responsible for noise pollution