
सामना ऑनलाईन । दुबई
आशिया कप क्रिकेट स्पर्धेत हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामना बुधवारी रंगणार आहे. त्यामुळे हिंदुस्थान-पाकिस्तानचे आधीचे सामने, खेळाडूंचे वाद अशा साऱ्याच गोष्टींची चर्चा रंगली आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार आणि जलदगती गोलंदाज वासिम अक्रम यांनी माजी क्रिकेटपटू मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या संदर्भातील एक आठवण सांगितली.

1889 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर असलेल्या हिंदुस्थानी क्रिकेट संघात 16 वर्षाच्या सचिन तेंडुलकरचा समावेश होता. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची ही सुरुवात होती. ही बातमी पाकिस्तानी संघाला कळली आणि प्रत्यक्षात सचिनला बघितल्यावर तो 14च वर्षाचा आहे, असं आम्हाला वाटालं. म्हणून मी त्याला जवळ बोलवून, ‘आईला विचारून आलास का?’ अशी मी चेष्टा देखील केली होती, असं अक्रम यांनी सांगितलं.
मला सचिनच्या त्या धाडसाबद्दल अत्यंत आदर होता आणि त्याचा खेळ जसा बहरत गेला तसा हा आदर आणखीन वाढला, असंही त्यांनी सांगितलं.

























































