चार तासांत दोन किलो वजन कमी करीत मेरी कोमने सुवर्ण जिंकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mary-kom

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

हिंदुस्थानची स्टार आणि अनुभवी बॉक्सर हिने पोलंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत हिंदुस्थानसाठी सुवर्णपदक जिंकले. हे तिचे या वर्षातील तिसरे पदक ठरले. पण हे पदक मिळवण्यासाठी तिला प्रचंड कसरत करावी लागलीय. चार तासांत दोन किलो वजन कमी केल्यानंतर तिला हा ‘गोल्डन’ पंच मारता आलाय. हे दस्तुरखुद्द मेरी कोम हिने मायदेशात परतल्यानंतर सांगितले.

मेरी कोम याबाबत म्हणाली, आम्ही पहाटे 3 ते 3.30च्या सुमारास पोलंडला पोहोचलो. आमचे वजन 7.30 वाजता होणार होते. मला 48 किलो वजनी गटात सहभागी व्हायचे होते, पण त्याप्रसंगी त्यापेक्षा जास्त वजन माझे होते. वजन कमी करण्यासाठी फक्त चार तास माझ्या हातामध्ये होते. त्यानंतर तब्बल एक तास स्किपिंग केले. त्यानंतर आणखी काही कसरती केल्या. तसेच ज्या विमानात बसून पोलंडला आली त्या विमानात गर्दी नसल्यामुळे पाय पसरून झोपता आले. त्यामुळे थकवा जाणवला नाही. याचा फायदा मला झाला. अन्यथा या स्पर्धेत मला बाहेरचा रस्ता मिळाला असता, असेही तिने आवर्जून सांगितले.