
सामना प्रतिनिधी। औसा
औसा तालुक्यातील भादा परिसरात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. यामुळे भादा येथील शेतकरी गणेश प्रभु शिंदे यांनी शासनाच्या एन. एच. एम. या योजनेंतर्गत 41×41 मीटर वर शेततळे तयार करून ठिबक सिंचनावर सुमारे दहा एकरवर ऊस पिक जोपासण्यास सुरूवात केली आहे.
भादा परिसर हा कमी पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो. मात्र यावर्षी पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे सोयाबीन, उडीद, तूर, ऊस हे पिके सुकू लागली आहे. विहीर बोअर साठवण तलाव कोरडे पडले आहेत.
मात्र गणेश शिंदे या शेतकर्यांने दुष्काळावर मात करून शेततळ्यावर ऊस हे पिक पूर्ण ठिबक सिंचनावर जोपासत आहेत .त्यानी पावसाळ्यात शेततळ्यात पाणी साठवण करून ऊसमळा फुलवला आहे याआधी टोमॅटो, खरबूज, मिरची हे पिकं त्यांनी घेतली होती. हे शेततळे पहाण्यासाठी गर्दी होत आहे .अन्य शेतकऱ्यांनी याचा अवलंब करून उत्पादन वाढवावे असा संदेश शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
































































