
सामना ऑनलाईन । नगर
श्रीगोंद्याचे माजी आमदार तसेच राज्य सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष बापूसाहेब नागवडे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबई येथे बुधवारी लीलावती रुग्णालयांमध्ये त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व चार मुली असा परिवार आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालवली होती त्यांना पुणे येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती आणखीनच खालवल्याने त्यांना बुधवारी मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे दुपारी चार वाजता निधन झाले आहे. दरम्यान, बापूसाहेब यांच्या श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी या मूळ गावी त्यांच्यावर गुरुवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
बापूसाहेब नागवडे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याची उभारणी मध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. सध्या राज्य सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. .






























































