
सामना प्रतिनिधी। कुडाळ
गणपती बाप्पा मोरया… मंगलमुर्ती मोरया… पुढच्यावर्षी लवकर या.. अशा जयघोषात फटाक्यांच्या आतषबाजीत बुधवारी कुडाळ तालुक्यातील सात दिवसांच्या गणपतीं बाप्पांचे मोठ्या थाटात भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
कोकणात दिड, पाच, सात, अकरा, सतरा, एकवीस दिवस असे गणपतीचे घरोघरी पूजन केले जाते. बुधवारी सायंकाळी तालुक्यातील सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत श्रींची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली. कुडाळ शहरातील भंगसाळ नदीसह तालुक्यात ठिकठिकाणी नदी,तलाव, ओहळ आदी ठिकठिकाणी सात दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात आला. कुडाळ शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

































































