‘लवरात्री’ नव्हे आता ‘लवयात्री’, हिंदू संघटनांच्या विरोधानंतर सलमानने बदलले सिनेमाचे नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सलमान खान निर्मित ‘लवरात्री’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र हिंदू संघटनांनी सिनेमाच्या टायटलवर घेतलेल्या आक्षेपानंतर सलमानने अखेर सिनेमाचे नाव बदलून ‘लवयात्री’ असे ठेवले आहे.

हिंदू धर्माशी संबंधित ‘नवरात्री’ या सणाशी मिळतेजुळते नाव असल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत काही हिंदू संघटनांनी या सिनेमाच्या टायटलवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे सलमानने विरोध टाळण्यासाठी सिनेमाचे टायटलच बदलले आहे. सलमानने सिनेमाच्या बदललेल्या टायटलची घोषणा आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केली आहे. ‘ही स्पेलिंग मिस्टेक नाही’ असं सलमानने नवीन पोस्टर शेअर करत म्हटले आहे. येत्या 5 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून सलमानचा मेहूणा आयुष शर्मा या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. त्यासोबत वरिना हुसैन ही नवोदित अभिनेत्री झळकणार आहे.