तुळशीच्या पानफुलांनी नटला विठोबा माझा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

आज भाद्रपद शुद्ध एकादशीचे औचित्य साधून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती व्यवस्थापनाने श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यात तुळशीपानांची आकर्षक अशी सजावट करून गाभारा मनमोहक करण्यात आला आहे.

नेहमी रंगेबेरंगी पानाफुलांनी सजविलेला गाभारा आज हिरव्या गर्द तुळशीने नेत्रदीपक दिसत होता. एकादशीच्या निमित्ताने आलेले भाविक ही विलोभनीय सजावट पाहून सुखावले. तुळस ही विठुरायला प्रिय आहे. आजवर तुळशी माळ विठुरायाच्या गळ्यात असायची आज संपूर्ण गाभारा तुळशीपानांनी सजला होता, ते पाहून धन्य झाल्यासारखं वाटलं, अशी प्रतिक्रिया भाविकांनी व्यक्त केली आहे.