
सामना ऑनलाईन । कोच्ची
केरळ नन बलात्कार प्रकरणी कोट्टयममधील न्यायालयाने बिशप फ्रँको मुलक्कल याचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बिशपला शुक्रवारी दुपारी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याचा जामीन अर्ज नाकारण्यात आला. पोलिसांनी बिशपला शुक्रवारी संध्याकाळी अटक केली होती.
तपास पथकाने तीन दिवस कसून चौकशी केल्यानंतर बिशपला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांना जामीन देण्यात यावा अशी मागणी बिशप यांच्या वकीलांनी केली. मात्र. पोलिसांनी जामीन अर्जाला विरोध करत तपासाला गती देण्यासाठी तीन दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बिशपला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
#WATCH Former Bishop of Jalandhar, Franco Mulakkal, being taken into police custody, at magistrate court in #Kerala‘s Kottayam. pic.twitter.com/GkbMiQKov1
— ANI (@ANI) September 22, 2018
बिशप मुल्लकल याने शुक्रवारी रात्री छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याला सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयरोग विभागात त्याला सहा तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवल्यानंतर शनिवारी त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. त्याचा रक्तदाब वाढल्याने त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 2014 मध्ये बिशपने आपल्यावर बलात्कार करून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार जूनमध्ये एका ननने दाखल केली होती. चर्च प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून ही त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ननने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. बिशप यांनी ननचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
























































