‘स्टार्टअप’मध्ये सतत संशोधन करणे महत्त्वाचे !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी माणूस उत्सवप्रिय मानला जातो. गणेशोत्सव हा तर मराठी सणांचा मानबिंदू. या गणेशोत्सवानिमित्त अनेकविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मुलुंडमधील अरुणोदय मित्रमंडळाने उद्योगास प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी संभाजी हॉल, मुलुंड(पू) येथे करण्यात आले होते. सार्वजनिक गणेशोत्सवात पहिल्यांदाच ‘ स्टार्टअपचा श्रीगणेशा’ अशा प्रकारचा उद्योगाविषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास 20 पेक्षा अधिक स्टार्टअप सुरु केलेले व लघु-मध्यम स्वरूपाचे उद्योजक उपस्थित होते. व्यवसायात नवउद्योजकांना विपणन कसे करावे, आर्थिक भांडवल कसे उभारावे, कौशल्य असलेले कामगार मिळण्याची नक्की काय केले पाहजे अशा अनेक समस्या आसतात. कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी उपस्थित उद्योजकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.

“उद्योगधंद्यात खर्चकपात करा. महाविद्यालयीन तरूणांना शिकाऊ उमेदवार घ्या. अत्यंत कमी खर्चात कौशल्य असलेले उपयुक्त मनुष्यबळ तुम्हांला उपलब्ध होते. कंपनीचे रेव्हेन्यू मॉडेल विकसित करा. प्रत्येक समस्येवरचा उपाय बिझनेस मॉडेल होऊ शकत नाही. त्यामुळे संशोधनावर भर द्या. उद्योगवाढीसाढी सुलभरित्या उपलब्ध असलेल्या आणि सर्वदूर पोहोचलेल्या सोशल मीडियाचा वापर करा. असे कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले.

उपस्थित उद्योजकांपैकी दोन जेष्ठ नागरिकांनी निवृत्तीनंतर व्यवसाय सुरु केला. त्यातील एक आर्थिक नियोजनाचा व्यवसाय करतात तर दुसरे जपानची सैर पर्यटकांना घडवून आणतात. पार्किंगचे व्ववस्थापन, भारतातील तरुणांना परदेशात नोकरीसाठी पाठविणे आदी स्टार्टअप देखील यावेळी सहभागी झाले होते.