
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राफेल विमान करारावर भाजपला चौफेर घेरण्यात यशस्वी झालेल्या काँग्रेसला भाजप जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. राफेलप्रकरणी काँग्रेसच्या माजी अध्य़क्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वडेरा हे तुरुंगामध्ये जातील, असा इशारा भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेमध्ये पुरावा म्हणून पात्रा यांनी रॉबर्ट वडेरा यांचे लंडन येथील 19 कोटींच्या घराचे छायाचित्र आणि वडेरा यांचे ज्यूरिचला गेल्याचे विमानाचे तिकीट सादर केले आहे. यामुळे काँग्रेस गोत्यात येण्याची शक्यता आहे. तसेच देशातील भ्रष्टाचाराच्या प्रत्येक प्रकरणात काँग्रेसचा सहभाग आहे. काँग्रेसला कमिशन न मिळाल्यामुळे आणि राहुल यांच्या लाँचिंगसाठी राफेलवर वाद केला जात असल्याचा गंभीर आरोप पात्रा यांनी काँग्रेसवर केला आहे.
Rafale documents were recovered from Robert Vadra’s close friend Sanjay Bhandari during a raid in 2016 at his house, how did these confidential documents reach there? Bhandari’s company ‘offset India solutions’ was red flagged in 2014 by Modi Govt: Sambit Patra,BJP pic.twitter.com/jqX4MlxGCh
— ANI (@ANI) September 25, 2018
रॉबर्ट वडेरांविरोधात एफआयआर दाखल
वडेरा यांनी आपले मित्र संजय भंडारी यांच्याबरोबर एक ऑफसेट कंपनी सुरु केली होती. परंतु, संजय भंडारी आणि दसॉल्ट यांच्यात न जमल्यामुळे राफेल व्यवहार यूपीएच्या काळात होऊ शकला नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर संजय भंडारी यांच्यावर कारवाई होत आहे. आता रॉबर्ट वडेरा यांच्याभोवती फास आवळला जात आहे. ते वाचणार नाहीत. एकदिवस ते नक्कीच तुरुंगात जातील. हा काही राजकीय बदला घेण्याचा प्रकार नसल्याचे त्यांनी लालूप्रसाद यादव यांचे उदाहरण देऊन सांगितले.
संजय भंडारी याने 2008 मध्ये एक लाखांच्या भांडवलाच्या माध्यमातून ऑफसेट कंपनी बनवली होती. जी नंतर हजारो कोटींची कंपनी झाली. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर दलाली करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई सुरू झाली. 2014 मध्ये भंडारीच्या घरावर, कार्यालयावर छापे पडले. छाप्यात संरक्षण मंत्रालयातील दस्तावेज, संरक्षण व्यवहाराचे गोपनीय कागदपत्रे घरी मिळाले. राफेलची कागदपत्रेही भंडारीच्या घरी मिळाली. अनेक इ-मेल्स आढळून आली. लंडनमध्ये भंडारीचे नातेवाईक सुमीत चड्ढाद्वारे वडेरा यांच्यासाठी 19 कोटींचे घर खरेदी केल्याची माहिती आहे. 2009 मध्ये हे घर खरेदी केल्याचे पात्रा यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.





























































