बहुपयोगी बेकींग सोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुपयोगी बेकींग सोडा

  • बगलेतील काळेपणा दूर करण्यासाठी बेकिंग सोडा पाण्यात भिजवून लावा. 4 ते 5 मिनिटांनी तो भाग थंड पाण्याने स्वच्छ धुवा. आठवडाभर हा उपाय केल्यास परिणाम जाणवतो.
  • दातांवर पिवळे डाग दिसत असतील तर पेपर नॅपकीनची एक पट्टी लांब कापा. त्या संपूर्ण कागदावर टुथपेस्ट लावा. टुथपेस्टवर बेकिंग सोडा मिसळा. हा कागद दात संपूर्ण झाकले जातील असा लावा. पाच मिनिटांनी कागद काढून तोंड स्वच्छ धुवा.
  • श्वासाला दुर्गंध येत असल्यास बेकिंग सोडा आणि माउथवॉश घरी तयार करू शकता. त्यासाठी अर्धा ग्लास पाण्यात थोडासा बेकिंग सोडा टाकून चमच्याने ढवळा. या पाण्याने चूळ भरा. तोंडाला येणारा वास लगेचच दूर व्हायला मदत होईल.
  • कपड्याला रक्ताचे डाग पडल्यास ते रात्रभर बेकिंग सोड्याच्या पाण्यात भिजत घाला. सकाळी हलक्या हाताने घासा. डाग निघून जातील, कारण बेकिंग सोडा हे नैसर्गिक क्लिन्झरचे काम करते.
  • चांदीचे दागिने काळे पडले असतील तर बेकिंग सोड्याच्या पाण्यात तासभर भिजत ठेवा. दागिने नवीन असल्याप्रमाणे चकाकतील.
  • कधी कधी टॅनिंगमुळे त्वचेवर डाग पडतात. अशावेळी अर्ध्या लिंबावर बेकिंग सोडा लावा आणि 30 सेकंद हे लिंब डाग पडलेल्या भागावर चोळा. त्यामुळे डाग जाऊन त्वचा स्वच्छ होते.
  • पाण्याने अर्धे भरलेल्या भांड्यात बेकिंग सोडा मिसळा. या पाण्यात काही वेळ हात भिजत ठेवा. यामुळे नखांचा पिवळेपणा जाईल.