त्रिंबक येथे इसमाची गळफास लावून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

त्रिंबक देवूळवाडी येथील मंगेश श्रीधर घाडीगांवकर (वय- ५५) यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी घराशेजारील मांगरामध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती आचरा पोलीस ठाण्यास दिली असून मंगेश यांनी दारूच्या नशेत आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

त्रिंबक देवूळवाडी येथील मंगेश घाडीगांवकर हे तीन भाऊ, दोन मुलांसह राहत होते. दिड वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जेवण करून भावू सुहास सोबत झोपले होते. पहाटे सुहासला जाग आल्यावर पाहिले तर मंगेश न दिसल्याने शोध घेतला. त्यावेळी घरालगतच्या मांगराच्या दारात बॅटरी पेटत असल्याचे दिसले. त्यांनी वर पाहिले असता मंगेश यांनी वाशाला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्रिंबक पोलीस पाटील सिताराम सकपाळ यांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी आचरा पोलीस ठाण्यास घटनेची माहिती दिली. अधिक तपास आचरा पोलीस करत आहेत.