केरळात दोन पाद्र्यांच्या भाजप प्रवेशाने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । तिरुवअनंतपुरम

ख्रिश्चन आणि मुस्लीमबहुल लोकसंख्या असलेल्या केरळमध्ये दोन पाद्र्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने खळबळ माजली आहे. येथील जेकबाईट सीरियन चर्चचे हे पाद्री आहेत. याशिवाय याच चर्चमधील एका डीकननेही भाजपचे सदस्यत्व स्वीकारल्याचं समोर येत आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गीवगीर्ज किझाक्केडथ आणि थॉमस कुलाथनकुल अशी या दोन पाद्र्यांची नावं आहेत. तर अँड्य्रुज मंगलथ असं या डीकनचं नाव आहे. या तिघांनी केरळचे भाजप अध्यक्ष पीएस श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. जेकबाईट सीरियन चर्चने कोणाच्याही राजकीय स्वातंत्र्यावर बंधनं घातलेली नाहीत, त्यामुळे तिथे असणारे पाद्री कोणत्याही राजकीय पक्षात सामील होऊ शकतात असं या चर्चच्या बिशपचं म्हणणं आहे.

या भाजप प्रवेशामुळे या भागात खळबळ माजली असून उलटसुलट चर्चा रंगत आहेत. या पाद्र्यांनंतर अजूनही काही जण भाजपमध्ये प्रवेश करू शकतील असंही बोललं जात आहे.

summary- two fathers join bjp in kerala