कोपरगावची 45 गावे हुमणीच्‍या तडाख्यात, 1100 हेक्‍टर क्षेत्र बाधित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

कोपरगांव तालुक्याच्या गोदावरी नदीकाठच्या 22 ते 45 गावांत हुमणी अळीचा मोठया प्रमाणांत उस पिकावर प्रार्दुभाव झाला असून 1 हजार 782 शेतकऱ्यांना त्याचा तडाखा बसला आहे. या संदर्भात आपण जिल्हा कृषि अधिकारी तसेच वसंतराव शुगर इन्स्टीटयुटचे तज्ञ मंडळींशी बोलून त्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यांबाबत सुचना केल्याची माहिती आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

तालुका कृषि अधिकारी अशोक आढाव यांनी जिल्हा कृषि अधिकारी लोणारे यांच्या मार्गदर्शनांखाली याबाबत शेतकऱ्यांना गांवोगांव प्रशिक्षण देण्यांबाबत कार्यवाही सुरू केल्याचेही त्या म्हणांल्या. संजीवनी साखर कारखान्यांचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी कारखान्यांच्या उस विकास विभागाअंतर्गत यावरील उपाय योजना सुरू केल्या असून शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर हुमणीअळीचे उच्चाटनांबाबत माहिती देवुन उस पीक वाचविण्यावर भर देत आहेत.

कोपरगांव तालुक्यात ११०० हेक्टर क्षेत्रावरील उस पीकांवर हुमणी अळीचा प्रार्दुभाव झाला आहे. शेतकऱ्यांनी याबाबत घाबरून न जाता वेळीच त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. हुमणी अळी बाधीत क्षेत्रात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रकाश सापळे लावून, एरंडीच्या बियांचा वापर करून भूंगे गोळा करावे याबाबत अधिक माहिती हवी असल्यास तालुका कृषि अधिकारी अशोक आढाव व संजीवनी कारखान्यांच्या उस विकास विभागाशी संपर्क साधावा. यापुर्वीही उस पीकावरील लोकरीमाव्याचा प्रार्दुभाव रोखण्यांत येथील शेतकरी यशस्वी झालेले आहे तेंव्हा आताही हुमणी अळीचा प्रार्दुभाव कमी करण्यांबाबत आपण सर्वचजण जाणीवपुर्वक प्रयत्न करत आहोत. बोंडअळी दुष्काळ यामुळे शेतकरी अगोदरच ग्रासला आहे. हुमणी अळीचे संकट नवीन आहे. या किडीच्या प्रार्दुभावामुळे बाधीत झालेल्या उस पिकाला शासनांकडुन काही भरपाई मिळेल काय याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री प्रा राम शिंदे यांच्याकडे प्रयत्नशिल असल्याचे त्या शेवटी म्हणांल्या.