
सामना ऑनलाईन । मुंबई
कोणताही प्रश्न, कोणतीही शंका तत्काळ सोडवणारा आपला परममित्र ‘गुगल’ ने गुरुवारी 20 वा वाढदिवस साजरा केला. जगातील प्रसिद्ध व्यक्तींचे वाढदिवस विशेष डुडल साकारून सेलिब्रेट करणार्या गुगलने स्वतःच्या वाढदिवसाचे खास डुडल तयार केले. गुगलच्या या डुडलवर क्लिक केल्यावर एक व्हिडिओ दिसतो. यामध्ये गुगलने दोन दशकांतील आठवणींना उजाळा दिला आहे.
लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांनी गुगलची स्थापना केली. 1997 साली कंपनीने डोमेन रजिस्टर करत अधिकृतपणे ‘गुगल’ हे नाव ठेवलं. 1998 साली गुगलनं आपला पहिला वाढदिवस साजरा केला होता. गुगल हे सर्च इंजिन नऊ हिंदुस्थानी भाषांमध्ये आणि जगभरातल्या 124 भाषांमध्ये उपलब्ध आहे.
































































