महापौरांच्या यशस्वी मध्यस्थीने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

नगर महानगरपालिकेच्या महापौर सुरेखा कदम यांच्या यशस्वी मध्यस्थीने पालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याबाबतचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने मान्य केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. नगर मनपा कर्मचारी संघटनेने महापौर सुरेखा कदम, स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे, विरोधीपक्ष नेते बाळासाहेब बोराटे, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी राजे कदम,उपायुक्त प्रदीप पठारे यांचा पालिका कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी पालिकेचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.