देवली  गाव प्रकाशमय, आमदार नाईक यांच्या हस्ते स्ट्रीट लाईटचा शुभारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

जिल्हा नियोजन निधीमधून देवली काळेथर वाडी येथे उभारण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते  करण्यात आला.  गावामध्ये  ६० वीज खांब उभारून स्ट्रीट लाईट बसविण्यात आली आहे. यामुळे देवली  गाव प्रकाशमय झाला आहे. याबद्दल देवली वासियांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला.

आमदार वैभव नाईक म्हणाले की, “पालकमंत्री खासदार  व आपल्या माध्यमातून या विभागात अनेक विकास कामे करण्यात आली आहेत. उर्वरित विकास कामेही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. ग्रामस्थांना आवश्यक सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. देवली गावा साठी अजूनही स्ट्रीट लाईटची आवश्यकता आहे. त्यासाठीही लवकरच निधीची तरतूद करू” असे त्यांनी सांगितले.

यावेळी मतदार संघाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे जि .प सदस्य हरी खोबरेकर, देवली सरपंच गायत्री चव्हाण, उपसरपंच भाऊ चव्हाण, जिल्हा नियोजन समिती सदस्य भाई गोवेकर, किसन मांजरेकर,  गणेश कुडाळकर, जयवंत मयेकर, भाई मयेकर, आबा केळुसकर, राजू मेस्त्री, गणेश मयेकर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.