
सामना ऑनलाईन । टोकियो
मोबाईल फोन पाण्याने धुतला तर तो खराब होतो हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. मात्र जपानची कंपनी आता एक असा मोबाईल तयार करतेय जो पाण्याने धुतला जाऊ शकतो. विश्वास बसत नाही ना… जपानी कंपनीने हे शक्य करून दाखवलंय.
हा फोन केडीडीआय कंपनी लाँच करणार आहे. डिग्नो रेफर असे या स्मार्टफोनचे नाव आहे. कंपनीने या फोनला किमान 700 वेळा तरी धुतले. मात्र तरीही फोनला काहीच झाले नाही. फोन चांगला सुरू आहे. कंपनीने या फोनची किंमत 21600 येन म्हणजेच 75 डॉलर्स एवढी निश्चित केली आहे.
summary- waterproof smart phone to be launch soon






























































