दुभाजकवर आदळून गाडी झाली पलटी, दोन महिला ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नगर

नगरमध्ये रस्त्याच्या दुभाजकाला गाडी आदळून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा अपघात नगर- संभाजीनगर रोडवर पांढरीपूल येथे झाला आहे. तसेच या गाडीतील लोक पाथर्डीवरून कायगाव टोकाच्या दिशेने जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एका हॉटेलसमोर असलेल्या रस्त्याच्या दुभाजकावर त्यांची गाडी वेगाने आदळली.

या अपघातात गाडीतील उज्ज्वला गोरे व अनिता गोरे या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर बाबासाहेब गोरे आणि निलेश गोरे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.