VIDEO : कॅन्सर थेरेपी संशोधकांना यंदाचा नोबेल पुरस्कार जाहिर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

जगातला सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 2018 नोबेल पुरस्काराती घोषणा करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय संशोधन केल्याबद्दल यंदाचा वैद्यकीय क्षेत्रासाठीचा नोबेल पुरस्कार जेम्स पीअॅलिसन आणि तसुकू होन्जो यांना जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही वैज्ञानिकांनी संयुक्तरित्या कॅन्सर सारख्या भयंकर रोगावर उपयोगी पडणारी थेरेपी विकसित केली आहे. त्यांची थेरेपी कॅन्सर पिडीतांना मोठा दिलासा ठरणार आहे. दरम्यान, यंदा पहिल्यांदाच साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.