
सामना ऑनलाईन, मुंबई
मध्यम रेल्वेने खास स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी तयार केलेली लोकल मध्य रेल्वेच्या ठाणे-पनवेल मार्गावर धावणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर या लोकलच्या चार फेऱ्या होणार आहेत. या लोकलवर स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करणारे संदेश रंगविण्यात आले आहेत.
सुटणार पोहचणार
- पनवेल स.6.37 वा. ठाणे स.7.29 वा.
- ठाणे स.7.35 वा. वाशी स.8.04 वा.
- वाशी स.8.12 वा. ठाणे स.8.41 वा.
- ठाणे स.8.51 वा. नेरूळ स.9.21वा.



























































