
सामना प्रतिनिधी । उरण
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांनी मंगळवारी (२) घारापुरी बेटाला भेट देऊन येथील विकास कामे तसेच विविध समस्यांना बाबत सरपंच बळीराम ठाकूर यांच्याशी चर्चा केली.
या भेटी दरम्यान बेटाची पाहणी करून समस्याही जाणून घेतल्या. बेटावर मुख्य सचिव डी. के. जैन यांचे घारापुरी ग्रामपंचायतीच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी उपसरपंच सचिन म्हात्रे, ग्रामविकास अधिकारी अमित तपकीरे, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्य सचिव डी. के. जैन यांनी घारापुरी लेण्यांचाही आनंद घेतला.






























































