
सामना ऑनलाईन। मुंबई
बॉलिवूडमध्ये सध्या घटस्फोट व ब्रेकअपची मालिकाच सुरू झाली आहे. यात आता अजून एका जोडीचा समावेश झाला आहे. तीन वर्षाच्या रिलेशनशिप नंतर अभिनेता टायगर श्रॉफ आणि दीशा पटानी यांचा ब्रेकअप झाला आहे.
पिंकविलाने याबद्दल वृत्त दिले आहे. टायगर दीशा तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. त्यांना अनेकवेळा एकत्र लंच, डीनर करताना शॉपिंग करताना अनेकांनी पाहीले होते. पण गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या या सर्वात रोमेँटीक जोडीमध्ये बिनसले होते. टायगर उत्कृष्ट नृत्य व फिटनेससाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत दीशानेही नृत्याचे शिक्षण घेतले. ती सतत त्याच्या मागावर होती. टायगर कुठे जातो कोणाबरोबर बोलतो यावर दीशाचे लक्ष होते. दीशाच्या सांगण्यावरून टायगरने काही दिवसांपूर्वी ‘नो किसींग क्लॉज’वरही स्वाक्षरी केली होती. यापुढे चित्रपटात प्रणयदृश्य करणार नसल्याचेही टायगरने दिग्दर्शकाला सांगून ठेवले होते. टायगरने दीशासाठी स्वत:ला खूपच बदलले होते. असे त्यांचे मित्रही सांगत आहेत. पण तरीही दोघांमध्ये अंतर आले. यातूनच त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी दोघांच्या बागी -२ या ब्लॉकबस्टर चित्रपटाने बक्कळ कमाई केली. टायगर व दीशाची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही खूप भावली होती.





























































