
सामना ऑनलाईन । राजकोट
मुंबईकर पृथ्वी शॉचे कसोटी क्रिकेटमधील पदार्पण निश्चित झाले आहे. हिंदुस्थान-वेस्ट इंडीजदरम्यानच्या कसोटी मालिकेस उद्या, 4 ऑक्टोबरपासून राजकोटच्या मैदानावर प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) संघ निवड समितीने बुधवारी ‘टीम इंडिया’तील अंतिम 12 खेळाडूंची घोषणा केली. या संघात 18 वर्षीय पृथ्वी शॉला सलामीचा फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आले आहे.
संघ निवड समितीने मयांक अग्रवालसह हनुमा विहारी व मोहम्मद सिराज यांना संघाबाहेर बसविण्याचा निर्णय घेतला. सलामीच्या स्थानासाठी पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांच्यात रस्सीखेच होती. मात्र मयांकला बाकावर बसविल्याने पृथ्वी शॉचे कसोटी पदार्पण निश्चित झाले असून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा तो हिंदुस्थानचा 293 वा खेळाडू ठरेल. पृथ्वी शॉने स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करून आणि हिंदुस्थानला 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावत निवड समितीला आपली दखल घ्यायला लावली. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही पृथ्वीची ‘टीम इंडिया’त निवड करण्यात आली होती, मात्र त्यावेळी त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळाली नव्हती.
कोहली भाई माझ्याशी मराठीत बोलला – पृथ्वी
विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर शिस्तबद्ध असतो, पण मैदानाबाहेर तो संघसहकाऱयांशी हसतखेळत राहतो. ड्रेसिंग रुममध्ये पाऊल ठेवल्यानंतर थोडा नर्व्हस होतो. पण येथे ज्युनियर-सीनियर असे काही नाही. रिलॅक्स रहा, असे विराट भाई व रवी सरांनी सांगितले. एवढेच नव्हे तर विराट भाई माझ्याशी मराठीत बोलला, असे पृथ्वी शॉ लढतीच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाला.
त्याच्याकडे क्षमता सिद्ध करण्याची संधी – कोहली
हिंदुस्थानी संघात केवळ सलामीच्या जोडीत बदल करण्यात आला आहे. लोकेश राहुलच्या साथीने पृथ्वी शॉ विंडीजविरुद्ध डावाची सुरुवात करेल. त्यामुळे पृथ्वीला आता स्वतःला सिद्ध करण्याची संधी असेल. युवा खेळाडूंना संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मधल्या फळीत बदल करण्याची गरज नाही. सर्वोत्तम संघाची बांधणी करण्यासाठी काही फलंदाजांना आणि काही गोलंदाजांना संधी देण्याचे काम सुरू आहे. संघात बदल केल्यामुळे आम्हाला टीकेला सामोरे जावे लागते, पण संबंधित खेळाडूला विश्वासात घेऊन असे निर्णय घेतले जातात.
करुण नायरचा प्रश्न टाळला
करुण नायर आणि इतर काही खेळाडूंना विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून कगळण्याबाबत पत्रकारांनी विराट कोहलीला प्रश्न विचारले. त्याकेळी तो म्हणाला की, मी संघाचा कर्णधार आहे, निकड समितीचा सदस्य नाही. त्यामुळे मी याकर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. तीन जणांची निवड समिती चर्चा करून संघाच्या निवडीबाबत निर्णय घेते. निकड समितीला आपली भूमिका आणि काम माहिती आहे. संघातील काही निर्णयांबद्दल निकड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिले आहे असे सांगून कोहलीने करुण नायरच्या निवडीबाबतच्या प्रश्नातून स्वतःची सुटका करून घेतली.
हिंदुस्थानचा कसोटी संघ – विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर.



























































