जीएसटी अधिनियमात सुधारणांना मंजुरी, एकाच राज्यात वेगवेगळे नोंदणी दाखले मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

सध्याच्या नियमानुसार व्यापार उद्योगासाठी एका राज्यात एकच नोंदणी करता येते. पण आता जीएसटी नोंदणी दाखल्याच्या तरतुदीत सुधारणा केल्यामुळे व्यापाऱ्यांना आता एकाच राज्यात वेगवेगळय़ा व्यापार उद्योगासाठी वेगवेगळे नोंदणी दाखले घेता येतील. याबाबतच्या अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

‘महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम- 2017’ मध्ये विविध सुधारणा करण्यासह त्याबाबतचा अध्यादेश काढण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या सुधारणांमुळे कोणतीही दरवाढ किंवा कपात होणार नसून त्यामुळे करदात्यांसाठी असलेल्या प्रक्रियेत सुलभता व सुसूत्रीकरण येण्यासह त्यांच्या अडचणी सोडवण्यास मदत होणार आहे.

मूळ स्रोतातून कर गोळा करण्यास (टीडीएस) पात्र नसलेल्या इलेक्ट्रनिक्स व्यापाऱयांना 20 लाख रुपयांची उलाढाल मर्यादा पार होण्यासाठी आता नोंदणी करणे आवश्यक नाही. ज्या पुरवठादारांच्या सेवांचा पुरवठा एकूण पुरवठय़ाच्या दहा टक्क्यांपर्यंत किंवा पाच लाख रुपयांपर्यंत जे जास्त असेल त्या व्यापाऱयाला या योजनेचा लाभ मिळेल.

summary-changes in gst bylaws for businessmen